Sunday, August 23, 2026
Homeदेश-विदेशSonia Gandhi : सोनिया गांधी यांची राज्यसभेवर निवड... रायबरेलीतून राहुल लढणार की...

Sonia Gandhi : सोनिया गांधी यांची राज्यसभेवर निवड… रायबरेलीतून राहुल लढणार की प्रियांका?

Sonia Gandhi : सोनिया गांधी यांची राज्यसभेवर निवड… रायबरेलीतून राहुल लढणार की प्रियांका?

[ad_1]

खासकरून गांधी कुटुंबाचे सदस्य मुख्यतः उत्तर प्रदेशमधून संसद सदस्य म्हणून निवडून गेलेले आहेत. जवाहरलाल नेहरू, फिरोज गांधी, इंदिरा गांधी, सोनिया गांधींपासून राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशातील विविध लोकसभा मतदारसंघाचं लोकसभेत प्रतिनिधीत्व केलं आहे. खुद्द सोनिया गांधी या २००४ सालापासून गेली तब्बल २० वर्ष रायबरेली लोकसभा मतदारसंघाचं लोकसभेत प्रतिनिधीत्व करत आहेत. तत्पुर्वी १९९९ ली सोनिया सर्वप्रथम कर्नाटकातील बेल्लारी आणि उत्तर प्रदेशातील अमेठी या दोन्ही मतदारसंघातून निवडून आल्या होत्या. बेल्लारी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा देऊन अमेठीचं सदस्यत्व कायम ठेवलं होतं. दरम्यान, राजस्थानमधून राज्यसभेचा अर्ज सादर करताना सोनिया गांधी यांनी रायबरेलीच्या मतदारांचे आभार मानले आणि माझ्या कुटुंबीयांसोबत राहण्याची विनंती केली होती. सोनियांनी कुटुंबीयांचा उल्लेख केल्यामुळे आता यापुढे रायबरेली मतदारसंघातून कॉंग्रेसमधून कोण निवडणूक लढवणार, याची या मतदारसंघात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, राहुल गांधी केरळच्या वायनाडचं प्रतिनिधीत्व करतात.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments