Maharashtracha Favorite Kon: महाराष्ट्राचा लाडका बॅडमॅन! ‘या’ अभिनेत्याने पटकावला सर्वोत्कृष्ट खलनायकाचा पुरस्कार

0
16
Maharashtracha Favorite Kon: महाराष्ट्राचा लाडका बॅडमॅन! ‘या’ अभिनेत्याने पटकावला सर्वोत्कृष्ट खलनायकाचा पुरस्कार


एखादा चित्रपट प्रदर्शित झाला की, त्या चित्रपटातील कलाकारांची जोरदार चर्चा होत असते. इतकंच नाही तर, त्या चित्रपटामुळे कलाकारांना तुफान प्रसिद्धी मिळते आणि त्यांच्या चाहत्यांमध्ये देखील वाढ होते. त्यांच्या स्टाईल्स अगदी सर्रास फॉलो केल्या जातात. त्या चित्रपटातील डायलॉग गाजतात. पण, चित्रपटाच्या नायक-नायिकांचा जसा चाहता वर्ग असतो, तसाच मोठा फॅन क्लब खलनायकांचासुद्धा असतो. आपल्या दमदार अभिनयाने चित्रपटसृष्टीतील खलनायकांची परंपरा अभिनयाने जपणारे अनेक कलाकार प्रेक्षकांची वाहवा मिळवत असतात. ‘महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण’ या पुरस्कार सोहळ्यात देखील अशाच खलनायकांचा गौरव करण्यात येतो. यंदा या पुरस्कार सोहळ्यात ‘सर्वोत्कृष्ट खलनायक’ म्हणून महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी अभिनेते सयाजी शिंदे यांची निवड केली आहे.



Source link