Namdeo Dhasal Biopic: नामदेव ढसाळ यांचा झंझावात झळकणार मोठ्या पडद्यावर, सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित

0
19
Namdeo Dhasal Biopic: नामदेव ढसाळ यांचा झंझावात झळकणार मोठ्या पडद्यावर, सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित


चित्रपटासाठी ढसाळ यांच्या पत्नीने दिली प्रतिक्रिया

नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांनी ही या चित्रपटावर प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, “आज १५ फेब्रुवारी नामदेवचा जन्मदिवस. दहा वर्षे झाली नामदेव ढसाळ नावाचा झंझावात शांत झाल्याला. नामदेवच समग्र कलंदरपण, विचारीपण, कविमन आणि माणसांप्रती असलेला प्रचंड जिव्हाळा या साऱ्या गोष्टी आपल्याला त्यांच्या ढसाळ चित्रपटातून दिसून येईल. या चित्रपटात नामदेवच नाही तर त्याच्या समग्र जीवनाबरोबरच त्यावेळची क्रांतिकारक परिस्थिती, त्यावेळचं राजकारण, पूर्ण दलित पँथर ची दहशत असलेली चळवळ असं सर्वांगीण समाजाचाच लेखाजोगा उभा राहील. त्याची बायोपिक हे फक्त वरुणाजींचं स्वप्नच नाही तर हा एक महत्वाचा ऐतिहासिक ‘बखरनामाच’आहे. एका महान लोकनायकाच्या जीवनावर चित्रपट बनविण्याच्या वरुणाजींच्या या महत्वाकांक्षेला माझ्या खूप शुभेच्छा आणि त्यांच्या अभ्यासपूर्ण कष्टांना व तळमळीला कडक सॅल्युट!”



Source link