Monday, August 24, 2026
Homeदेश-विदेशBharat Ratna Award | भाजप सरकारकडून माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव, चौधरी...

Bharat Ratna Award | भाजप सरकारकडून माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव, चौधरी चरण सिंह आणि एम. एस. स्वामीनाथन यांना भारतरत्न; पंतप्रधान मोदींनी ट्विटद्वारे केली घोषणा | Navarashtra (नवराष्ट्र)

Bharat Ratna Award | भाजप सरकारकडून माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव, चौधरी चरण सिंह आणि एम. एस. स्वामीनाथन यांना भारतरत्न; पंतप्रधान मोदींनी ट्विटद्वारे केली घोषणा | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

PM Narendra Modi Announced Bharat Ratna Award to former PM P.V. Narasimha Rao Chaudhary Charan Singh and M. S. Bharat Ratna to Swaminathan

PM Narendra Modi Announced Bharat Ratna Award to former PM P.V. Narasimha Rao Chaudhary Charan Singh and M. S. Bharat Ratna to Swaminathan

देशाचे माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव, चौधरी चरण सिंह आणि कृषी क्षेत्रात क्रांती घडविणारे एमएस स्वामीनाथन यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स अकाऊंटवरून ही घोषणा केली आहे.

Bharat Ratna Award : देशाचा सर्वोच्च पुरस्कार असलेल्या भारतरत्न पुरस्काराच्या नावांची घोषणा मोदी सरकारकडून करण्यात आली आहे. काँग्रेसचे नेते, देशाचे माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर केल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक्स अकाऊंटवरून केली. त्यांच्यासह माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह आणि कृषी क्षेत्रात क्रांती घडविणारे डॉ. एम.एस. स्मामीनाथन यांनाही भारतरत्न पुरस्कार जाहीर केल्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली. एक्स अकाऊंटवर पंतप्रधान मोदी यांनी तीन पोस्ट टाकून या तीनही नेत्यांच्या नावांची घोषणा केली. माजी पंतप्रधान नरसिंह राव यांच्याबद्दल भावना व्यक्त करताना ते म्हणाले, माजी पंतप्रधान नरसिंह राव यांना भारतरत्न पुरस्काराची घोषणा करताना मला आनंद वाटत आहे.

आर्थिक विकासाचे द्वार उघडणारे पी. व्ही. नरसिंह राव
“एक प्रतिष्ठित विद्वान राजकारणी पी. व्ही. नरसिंह राव यांनी भारताच्या विकासात महत्त्वाचे योगदान दिले. त्यांनी आंध्र प्रदेशचे (एकत्रित) मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि अनेक वर्ष संसद आणि विधानसभेचे सदस्य म्हणून काम केले. त्यांच्या दूरदरशी नेतृत्वामुळे भारत आर्थिक आघाडीवर पुढे आला. देशाला समृद्धी आणि विकासाच्या मार्गावर नेण्यात त्यांनी मोलाची कामगिरी बजावली”, असे गौरवोद्गार पंतप्रधान मोदी यांनी काढले.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments