
पुणे : संपूर्ण महाराष्ट्रात आणि पुण्यात गेले १२ वर्ष साहित्य आणि सांस्कृतिक उपक्रम राबावणाऱ्या मुक्ताई प्रतिष्ठानतर्फे समाजात आपल्या कार्यातून प्रेम आणि एकात्मतेचा संदेश देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येते.
या वर्षीचे “मुक्तरंग पुरस्कार २०२४” जाहीर करण्यात आले असून यामध्ये आजपर्यंत जवळपास २०० हून अधिक आंतरजातीय आणि आंतर धर्मीय विवाह करण्यास मदत करणाऱ्या के .अभिजीत यांना ‘मुक्तरंग प्रेमदूत पुरस्कार’, यू ट्यूब च्या माध्यमातून मनोरंजनातून समवयस्क मुलांना तसेच स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांना आयुष्यात यशस्वी होण्याचे अनेक पर्याय असतात हे सांगणाऱ्या जीवन आघाव यांना ‘मुक्तरंग युवा गौरव पुरस्कार’ तसेच गेले अनेक वर्ष साहित्य क्षेत्रात नवोदित साहित्यिकांना वेगवेगळ्या स्पर्धा आणि कविसंमेलणाच्या माध्यमातून संधि देणाऱ्या गणेश बनसोडे यांना ‘मुक्तरंग काव्यमित्र पुरस्कार’ देवून गौरवण्यात येणार आहे.
या पुरस्कारच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत श्रीपाल सबनीस सर असून प्रसिद्ध लेखक आणि उद्योजक शरद तांदळे यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. शनिवार दिनांक १० फेब्रुवारी या दिवशी या सोहळ्याला उपस्थित राहून रसिकांनी सहकार्य करावे असे आवाहन मुक्ताई प्रतिष्ठान चे अध्यक्ष सागर काकडे यांनी केले आहे.





