Saturday, August 15, 2026
Homeसातारालोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा काँग्रेसची तालुका व शहर आढावा बैठक संपन्न

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा काँग्रेसची तालुका व शहर आढावा बैठक संपन्न

फलटण |आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा काँग्रेसच्या वतीने फलटण तालुका व शहर काँग्रेस कमिटीची आढावा बैठक संपन्न झाली.

या बैठकीला सातारा जिल्हा काँग्रेसचे प्रभारी श्रीरंग चव्हाण पाटील, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सुरेश जाधव, महिला काँग्रेसचे अध्यक्ष सौ. अल्पना यादव, सरचिटणीस नरेश देसाई, सर्जेराव पाटील, फलटणचे निरीक्षक राजूभाई मुलाणी तसेच जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी सर्जेराव पाटील, मानाजीराव घाडगे, मुकेश मोहिते, दांगट पाटील, मंजिरी पानसे उपस्थित होते.यावे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर .यावेळी मान्यवरांचे स्वागत व सत्कार तालुका व शहर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर महेंद्र सूर्यवंशी बेडके यांनी प्रास्ताविक करून फलटण तालुक्याचा आढावा सादर केला.

बैठकीत डॉ. सुरेश जाधव व निरीक्षक श्रीरंग चव्हाण यांनी फलटण शहर तालुका व शहर काँग्रेसने बूथ कमिटी, प्रभाग समिती, ग्राम समिती तयार करण्यामध्ये जिल्ह्यामध्ये प्रशंसनीय कार्य केले असल्याचा आवर्जून उल्लेख केला. आगामी निवडणुका या ‘इंडिया’ आघाडीच्या माध्यमातून लढण्यात येणार असल्याचे सांगितले. तरी देखील सातारा, माढा लोकसभा काँग्रेसला मिळावी व फलटणला झुकते माप मिळावे, यासाठी प्रयत्न करत असल्याचे प्रतिपादन केले. फलटण तालुक्यातील काँगेस कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे. तसेच गावभेट दौरा चाल करावा, असे देखील सांगण्यात आले.

बैठकीचे सूत्रसंचालन शहराध्यक्ष पंकज पवार यांनी केले व कार्याध्यक्ष अमिरभाई शेख यांनी आभार मानले.कार्यक्रमानंतर सर्व पदाधिकाऱ्यांनी गजानन चौकातील महात्मा गांधींच्या पुतळ्याला अभिवादन केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments