Sunday, August 23, 2026
Homeसाताराफलटण येथे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजे गटाचा मेळावा : श्रीमंत रामराजे...

फलटण येथे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजे गटाचा मेळावा : श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या भूमिकेकडे जिल्हाच लक्ष

फलटण : फलटण तालुक्यातील श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना मानणारे राजे गटाची बैठक दि ०१ फेब्रुवारी रोजी अनंत मंगल कार्यालय येत बोलावली असल्याची माहिती समोर येत आहे

यामध्ये आगामी लोकसभा निवडणूकीच्या दृष्टीने विधानपरिषदेचे माजी सभापती तथा विधमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांची भूमिका जाणून घेणार असल्याचे समजत आहे

सूत्रांकडून मिळालेली खात्रीशीर माहिती अशी आहे की गेल्या काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये घडलेल्या घडामोडींनंतर श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे , अजितदादा पवार यांच्यासोबत जावून सत्तेमध्ये सहभागी झाले आहेत . त्यानंतर फलटण तालुक्यामध्ये अनेक घडामोडी घडल्या असल्याने त्यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माढा लोकसभा मतदारसंघासाठी फलटण तालुक्यात नक्की काय भूमिका घ्यायची , याबाबत मते जाणून घेवून पुढील भूमिका जाहीर करणार असल्याचे समजत आहे .

आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने गेल्या काही दिवसांपासून श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर हे माढा मतदारसंघातील प्रमुख नेत्यांची भेट घेत आगामी रणनीती आखत असल्याचे समोर येत आहेत.

आगामी माढा लोकसभा निवडणुकीबाबत श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे नक्की काय भूमिका जाहीर करणार या कडे तालुक्यासह माढा मतदारसंघाचे लक्ष लागून राहिले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments