Sunday, October 4, 2026
Homeदेश-विदेशभयंकर! 15 वर्षांच्या मुलाचा 13 वर्षीय मुलीवर बलात्कार; दुसऱ्यांदा अत्याचाराचा प्रयत्न करताच...

भयंकर! 15 वर्षांच्या मुलाचा 13 वर्षीय मुलीवर बलात्कार; दुसऱ्यांदा अत्याचाराचा प्रयत्न करताच…

[ad_1]

Crime News Today: 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलाने 13 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सूरत येथे ही घटना घडली आहे. लिंबायत येथे राहणाऱ्या महिलेने या मुलाविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर घडलेला सगळा प्रकार उघडकीस आला आहे. तिने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी मुलाने तिच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला तसंच, तिला सतत जीवे मारण्याची धमकीही देत होता. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुलाने पीडित तरुणीवर पुन्हा बलात्काराचा प्रयत्न केला. मात्र, तेव्हा मुलीने घाबरुन सर्व प्रकार आईला सांगितला. आईला हा सगळा प्रकार कळताच तिने पोलिस ठाणे गाठले आणि मुलाविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी मुलाला पॉक्सो कायद्याअंतर्गंत अटक केली आहे. 27 जानेवारी रोजी ही घटना उघडकीस आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीची आई जेव्हा कामावरुन घरी आली तेव्हा ती मुलगी एका कोपऱ्यात बसून रडत होती.  आईने तिला रडण्याचे कारण विचारले. तेव्हा तिने घडलेला सगळा प्रकार सांगितला आहे. साधारण दोन महिन्यांपूर्वी जेव्हा घरी कोणी नव्हते तेव्हा आरोपी घरी आला होता. आरोपी पीडित मुलीच्या आईसोबतच काम करत होता. त्यामुळं त्याचे घरी येणे जाणे होते. म्हणून पीडित तरुणीने त्याला घरे येऊ दिले. त्यानंतर तिने त्याला पाणीहि दिले. 

आरोपी घरात शिरताच त्याने घराचे दरवाजे बंद केले आणि तिच्यावर बलात्कार केला. तसंच, नंतर जर कोणासमोर घडलेल्या प्रकाराची वाच्यता केल्यास तिला व तिच्या लहान भावाला जीवे मारण्याची धमकी दिली.  27 जानेवारी रोजी पुन्हा एकदा आरोपी पिडित मुलीला भेटला. त्यानंतर त्याने तिला तिच्या भावाला घराबाहेर पाठवण्यास सांगितले. आरोपीने तिला तो घरी येणार असल्याचे सांगितले. त्यानंतर घाबरुन पिडीत तरुणीने रडायला सुरुवात केली.  

पीडितेची आई घरी आल्यानंतर तिने तिला रडण्याचे कारण विचारले. मात्र तरीही तिने सांगण्यास नकार दिला. तेव्हा तिच्या आईने तिला खोदून खोदून विचारल्यानंतर तिने दोन महिन्यांपूर्वी घडलेला सर्व प्रकार सांगितला. मुलीसोबत घडलेला प्रकार ऐकून आईच्या पायाखालची जमिनच हादरली. तसंच, आणखी एकदा तिच्यासोबत असाच घृणास्पद प्रकार घडणार असल्याचे लक्षात येताच ती हादरली. 

पीडितेच्या आईने तिच्यासह पोलीस ठाणे गाठले आणि आरोपीविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपी मुलाविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. तसंच, या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. 



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments