Manoj Jarange Patil : अध्यादेश मिळो अथवा न मिळो आझाद मैदानावर जाणारच, जरांगेंचा सरकारला पुन्हा अल्टीमेटम

0
22
Manoj Jarange Patil : अध्यादेश मिळो अथवा न मिळो आझाद मैदानावर जाणारच, जरांगेंचा सरकारला पुन्हा अल्टीमेटम


सरसकट आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही. सगसोयरे या शब्दावर आम्ही ठाम असून सरकारने सगेसोयरे शब्दाचा अध्यादेश काढवा. त्यानुसार, सगसोयऱ्यांकडून शपथपत्र लिहून घेतल्यानंतरच संबंधित कुटुंबाला आरक्षणाचं प्रमाणपत्र द्यावं, असेही जरांगे यांनी म्हटलं. सरकारने  आज रात्रीपर्यंत अध्यादेश काढावा, अशी मागणीही त्यांनी केली. अध्यादेशासाठी सरकारला उद्या १२ वाजेपर्यंत मुदत देतो. त्यानंतर आझाद मैदानाकडे जाणार आहे. अध्यादेश काढल्यास गुलाल उधळायला अन् अध्यादेश न काढल्यास उपोषण करण्यासाठी जाणार. मात्र काही झाले तरी आझाद मैदानावर जाणारच असे जरांगे म्हणाले.  



Source link