Saturday, October 3, 2026
Homeदेश-विदेशRam Mandir Inauguration | राम मंदिराला फुलांची आकर्षक सजावट; मंदिराच्या आतील मनमोहक...

Ram Mandir Inauguration | राम मंदिराला फुलांची आकर्षक सजावट; मंदिराच्या आतील मनमोहक दृश्ये आली समोर | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

राम मंदिराला फुलांची आकर्षक सजावट; मंदिराच्या आतील मनमोहक दृश्ये आली समोर

मंदिर उद्घाटन सोहळ्यासाठी राम मंदिर सजले असून आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. राम मंदिराच्या आतील काही फोटो व व्हिडिओ आता समोर आले आहेत.

अयोध्या : अनेक दशकांच्या प्रतिक्षेनंतर प्रभू श्री रामांची अयोध्येमध्ये(Ayodhya) प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. भव्य राम मंदिर उद्घाटन सोहळ्याला (Ram Mandir Inauguration) अगदी काही अवधी बाकी राहिला आहे. देशभरातून या सोहळ्याची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. देशभरामध्ये भक्तीमय वातावरण तयार झाले आहे. दरम्यान, मंदिर उद्घाटन सोहळ्यासाठी राम मंदिर (Ram Mandir) सजले असून आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. राम मंदिराच्या आतील काही फोटो व व्हिडिओ आता समोर आले आहेत.

राम मंदिर उद्घाटन सोहळ्यासाठी संपूर्ण अयोध्यानगरी सजली आहे. अनेक वर्षांनंतर प्रभू राम आपल्या जन्मस्थळी परतणार असल्याची भावना रामभक्तांची आहे. यामुळे सर्वत्र रामांच्या स्वागतासाठी तयारी केली जात आहे. मंदिरामध्ये उद्या दुपारी 12 नंतर प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरु होणार आहे. दरम्यान, मंदिराला मनमोहक अशी सजावट करण्यात आली आहे.



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments