Saturday, October 3, 2026
Homeदेश-विदेशplane crash in Afghanistan : अफगाणिस्तानात भीषण विमान दुर्घटना, अनेक प्रवाशी ठार...

plane crash in Afghanistan : अफगाणिस्तानात भीषण विमान दुर्घटना, अनेक प्रवाशी ठार झाल्याची भीती

[ad_1]

plane crash in Afghanistan fear of death of many passengers : अफगाणिस्तानमध्ये एक भीषण विमान दुर्घटना घडली आहे. बदखशान प्रांतात एक प्रवासी विमान कोसळले असून यात अनेक प्रवाशी ठार झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अफगाण मीडियाच्या वृत्तानुसार, विमान एका डोंगराळ भागात क्रॅश झाले आहे. जेबक जिल्ह्याच्या डोंगराळ भागात हे विमान कोसळले आहे. हे विमान नेमके कोणत्या देशाचे आहे या बाबत माहिती मिळू शकली नाही. दरम्यान, अफगाणिस्तानातील तालिबान सरकारकडून या बाबत अद्याप कोणतेही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान, हे विमान भारतीय असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, याला अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments