फलटण :राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माढा लोकसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवार अभयसिंह जगताप यांनी आज फलटण येथे पत्रकार परिषदेत पवार साहेबांनी जर आपल्याला माढा लोकसभेची उमेदवारी दिली तर आपण पूर्ण ताकदीने ही जागा लढवू, असे म्हटले आहे. शरद पवार साहेब व उध्दव ठाकरे साहेबांवर प्रेम करणाऱ्या जनतेने उमेदवार कोण आहे, हे न बघता साहेब जो उमेदवार देतील त्याला मोठ्या बहुमताने निवडून द्यावे, असे आवाहनही जगताप यांनी राष्ट्रवादी, शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांसह मतदारांना यावेळी के आहे.
या मतदारसंघात अजूनही मोठा इंडस्ट्रियल कॉरिडॉर नाही, त्यासाठी आपण येथील स्थानिकांना उद्योजक बनवून या मतदारसंघात मोठा इंडस्ट्रियल एरिया कसा निर्माण करता येईल हे पाहणार आहे. तसेच पाण्याचे जे अपूर्ण प्रोजेट आहेत, त्यांना फंड आणून हे प्रोजेट लवकरात लवकर कसे पूर्ण होतील, हे बघणार आहे, असेही जगताप यांनी सांगितले.
इंडिया आघाडीबाबत बोलताना जगताप म्हणाले की, इंडिया आघाडी मजबूत असून संपूर्ण देशात प्रत्येक लोकसभा मतदारसंघात एकच उमेदवार उभा केला जाणार आहे. त्यानुसार आपल्यालाही माढा लोकसभा मतदारसंघात इंडिया आघाडीकडून उमेदवारी मिळू शकते, अशी मला आशा आहे.