Wednesday, September 30, 2026
Homeदेश-विदेशRam Mandir | जगातील सर्वांत उंच राम मंदिर भारतात नव्हे तर 'या'...

Ram Mandir | जगातील सर्वांत उंच राम मंदिर भारतात नव्हे तर ‘या’ देशात बांधले जाणार | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

जगातील सर्वांत उंच राम मंदिर भारतात नव्हे तर ‘या’ देशात बांधले जाणार

भारताबाहेर देखील रामांचे भव्य मंदिर उभारण्यात येणार आहे. जगातील सर्वात उंच मंदिर हे भारताबाहेर उभारले जाणार आहे.

अयोध्येमध्ये राम मंदिर उद्घाटन सोहळा (Ayodhya Ram Temple inauguration) येत्या 22 तारखेला पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरामध्ये जय्यत तयारी केली जात आहे. फक्त भारतातच नाही तर परदेशामध्ये जिथे हिंदू बांधव आहेत त्या देशामध्ये या दिवशी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रभू रामांच्या जन्मस्थळी (Prabhu Ram Birthplace) हे मंदिर बांधण्यात येत असले तरी भारताबाहेर देखील रामांचे भव्य मंदिर (Ram Mandir) उभारण्यात येणार आहे. जगातील सर्वात उंच मंदिर हे भारताबाहेर उभारले जाणार आहे.

जगातील सर्वांत उंच राम मंदिर हे ऑस्ट्रेलियामध्ये उभारण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय श्री राम वैदिक आणि सांस्कृतिक संघटना (International ShriRam Vedic And Cultural Union Inc.) यांच्या अधिकृत वेबसाईटवर याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.  पश्चिम ऑस्ट्रेलियामधील पर्थ शहरामध्ये हे भव्य श्री राम मंदिर बांधणार आहे. हे मंदिर तब्बल 721 फूट उंच असणार असून जगातील हे सर्वांत उंच राम मंदिर (World’s tallest Ram temple)असणार आहे. या वास्तूचा प्राथमिक आराखडा देखील ISVACU च्या वेबसाईटवर दाखवण्यात आला आहे.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments