Friday, August 14, 2026
Homeमहाराष्ट्रSharad Mohol murder: शरद मोहोळ हत्याप्रकरणात पोलिसांकडून प्लँचेटचा वापर! बचाव पक्षाच्या वकिलांचा...

Sharad Mohol murder: शरद मोहोळ हत्याप्रकरणात पोलिसांकडून प्लँचेटचा वापर! बचाव पक्षाच्या वकिलांचा धक्कादायक आरोप

Sharad Mohol murder: शरद मोहोळ हत्याप्रकरणात पोलिसांकडून प्लँचेटचा वापर! बचाव पक्षाच्या वकिलांचा धक्कादायक आरोप

[ad_1]

सरकारी वकील नीलिमा इथापे-यादव व तक्रारदारांचे वकील अ‍ॅड. गोपाल भोसले यांनी यांनी तपासातील प्रगती पाहता आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढीची मागणी केली. बचाव पक्षाचे वकील अ‍ॅड. केतन कदम यांनी त्याला विरोध दर्शविला. ‘आरोपींची पोलिस कोठडी वाढविण्यासाठी तपास अधिकारी गृहितकावर आधारित जुनीच कारणे देत असून, बँक स्टेटमेंट, सीसीटीव्ही चित्रीकरण आदी तांत्रिक पुरावे पडताळण्यासाठी आरोपींच्या प्रत्यक्ष कोठडीची गरज नाही. असे ते म्हणाले. या सोबतच त्यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केला. ‘पोलिसांकडून आरोपींची पोलिस कोठडी मागितली जाते. त्यानंतर विविध बाबी पुढे येतात. पोलिस ‘प्लँचेट’ करतात,’ असा आरोप वकील अ‍ॅड. केतन कदम यांनी युक्तिवादादरम्यान केला. ही बाब बचाव पक्षाच्या वकिलांच्या आरोपामुळे नोंदीवर घ्यावी,’ अशी विनंती तपास अधिकारी सुनील तांबे यांनी केली. सरकारी वकील नीलिमा इथापे-यादव यांनीही बचाव पक्षाचे आरोप खोडून काढले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments