
निवडणूक आयोगाच्या प्रवक्त्याने सांगितले की, मतमोजणी सुरू आहे. हसीनाच्या सत्ताधारी अवामी लीगने 75 टक्क्यांहून अधिक जागा जिंकल्या आहेत.
बांगलादेशमध्ये सार्वत्रिक निवडणुक (Bangladesh election 2024) पार पडली. या निवडणुकीची मतमोजणी सुरु असुन महत्त्वाची बातमी समोर येत आहे. शेख हसीना यांच्या बांगलादेश अवामी लीगने पक्षाने सार्वत्रिक निवडणुकीत मोजलेल्या दोन तृतीयांशपेक्षा जास्त मते जिंकली आहेत. शेख हसीना पाचव्यांदा बांगलादेशच्या पंतप्रधानपदी विराजमान होणार आहेत. निवडणूक आयोगाच्या प्रवक्त्याने सांगितले की, मतमोजणी सुरू आहे. मात्र, हसीनाच्या सत्ताधारी अवामी लीगने 75 टक्क्यांहून अधिक जागा जिंकल्या आहेत.
हे सुद्धा वाचा
बांगलादेश सध्या अत्यंत धोकादायक आर्थिक विकासाच्या काळातून जात आहे. देश गरिबीशी झुंजत असताना शेख हसीना देशाचे नेतृत्व करत होत्या. त्यांच्या कार्यकाळात देशात मोठ्या प्रमाणावर मानवी हक्कांचे उल्लंघन झाले आणि विरोधकांवर कारवाई झाली. या सगळ्यासाठी पंतप्रधान शेख हसीना यांच्यावर आरोप करण्यात आले होते.










