
पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना केपटाऊनमध्ये खेळवला जात आहे. सामन्याचा आज (दि. ४ जानेवारी) दुसरा दिवस आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी आफ्रिकेचा संघ पहिल्या डावात 55 धावांत गारद झाला होता. आज दुसऱ्या डावात भारताने द. आफ्रिका १७६ धावांत गुंडाळले आहे. आता टीम इंडियाला या सामन्यात विजय मिळवून मालिकेत बरोबरी साधण्यासाठी ७९ धावांचे लक्ष्य आहे. द. आफ्रिकेच्या दुसऱ्या डावात मार्करमने शतकी खेळी केली. त्याच्या १०७ धावांच्या खेळीमुळे द. आफ्रिकेने १७६ धावांपर्यंत मजल मारली. दुसर्या डावात भारताचा वेगवान गाेलंदाज जसप्रीत बुमराह याने 6, मुकेश कुमार २, माेहम्मद सिराज आणि मुकेश कुमारने प्रत्येकी १ विकेट घेतली. (IND vs SA 2nd day, 2nd day)
भारताला पहिला धक्का, यशस्वी बाद
यशस्वी जैस्वालच्या रूपाने भारताला पहिला धक्का बसला. 23 चेंडूत 28 धावा करून तो बाद झाला. यशस्वीने रोहित शर्माच्या साथीने संघाला दमदार सुरुवात करून विजयाच्या जवळ नेले. त्याने सहा चौकार मारले. आंद्रे बर्गरच्या चेंडूवर तो ट्रिस्टन स्टब्सकरवी झेलबाद झाला
द. आफ्रिकेने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल आक्रमक फलंदाजी करत आहेत.






