Ayodhya Ram Mandir : तब्बल १०८ फूट लांब अन् ३५०० किलो वजनाची भव्य अगरबत्ती ट्रकमधून अयोध्येला रवाना, पाहा VIDEO

0
17
Ayodhya Ram Mandir : तब्बल १०८ फूट लांब अन् ३५०० किलो वजनाची भव्य अगरबत्ती ट्रकमधून अयोध्येला रवाना, पाहा VIDEO


२२ जानेवारी रोजी अयोध्येतील भव्य राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी बनवण्यात आलेली स्पेशल अगरबती गुजरातमधील वडोदरा शहरातून अयोध्याकडे रवाना झाली आहे. १०८ फूट लांब याअगरबत्तीला एका विशेष प्रकारच्या लांब ट्रकमधून नेले जात आहे. या भव्य अगरबत्तीचे वजन जवळपास ३५०० किलो असल्याचे सांगितले जात आहे. विविध प्रकारच्या वस्तुंपासून तयार करण्यात आलेल्या या अगरबत्तीचा उत्पादन खर्च ५ लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे. हवन सामुग्री,  शुद्ध तूप वगायीच्या शेणापासून ही अगरबत्ती बनवण्यात आली आहे.



Source link