Wednesday, September 30, 2026
Homeमहाराष्ट्रMaharashtra Weather update: नव्या वर्षात राज्यात ढगाळ हवामान; कुठे पाऊस तर कुठे...

Maharashtra Weather update: नव्या वर्षात राज्यात ढगाळ हवामान; कुठे पाऊस तर कुठे गारठा, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय ?

[ad_1]

Maharashtra weather update : राज्यात गुलाबी थंडीत सरत्या वर्षाला निरोप देऊन जल्लोषात नवीन वर्ष साजरे करण्यात आले. या नव्या वर्षात पुढील काही दिवस राज्याच्या हवमानात अनेक बदल अनुभवायला मिळणार आहे. राज्यावर कोणतीही वेदर सिस्टिम नसल्याने येत्या काही दिवसात राज्यातील तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाडा वगळता कोकण आणि मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात ढगाळ वातावरण राहणार असून विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पुढील दोन दिवस पावसाची शक्यता देखील आहे. मध्य महाराष्ट्रात काही जिल्ह्यात तर विदर्भातील अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात १ ते ७ जानेवारी दरम्यान काही ठिकाणीच ढगाळ वातावरणासह हलका पाऊस होण्याची शक्यता आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments