
पीएम मोदींना लिहिलेल्या पत्रात विनेश फोगटने म्हटले आहे की, साक्षी मलिकने कुस्ती सोडली आहे आणि बजरंग पुनियाने त्यांचे पद्मश्री परत केले आहे. मी ध्यानचंद खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत करत आहे.
भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्याविरोधात दिग्गज कुस्तीपटूंनी विरोध सुरूच ठेवला आहे. दरम्यान, विनेश फोगटने तिचा पुरस्कार परत करण्याची घोषणा केली आहे.
फोगट हिने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून मी माझा मेजर ध्यानचंद खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत करत आहे. मला या परिस्थितीत आणल्याबद्दल सर्वशक्तिमानाचे खूप आभार. हे पत्र तिने सोशल मीडिया X वर शेअर केले आहे.










