Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशIsrael Hamas War | ख्रिसमसच्या दिवशी इस्रायलचा गाझावर मोठा हवाई हल्ला,...

Israel Hamas War | ख्रिसमसच्या दिवशी इस्रायलचा गाझावर मोठा हवाई हल्ला, मुलांसह 70 लोकांचा मृत्यू! | Navarashtra (नवराष्ट्र)

Israel Hamas  War | ख्रिसमसच्या दिवशी इस्रायलचा गाझावर मोठा हवाई हल्ला, मुलांसह 70 लोकांचा मृत्यू! | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

ख्रिसमसच्या दिवशी इस्रायलचा गाझावर मोठा हवाई हल्ला, मुलांसह 70 लोकांचा मृत्यू!

इस्रायलने ख्रिसमसच्या पूर्वसंध्येपासून सोमवार सकाळपर्यंत गाझावर बॉम्ब हल्ला केला. या हल्ल्यात सुमारे 70 लोक ठार झाले असून त्यात अनेक महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे.

इस्रायल आणि हमास यांच्यात 80 दिवसांपासून युद्ध (Israel Hamas War) सुरू आहे. दोन्ही बाजूंनी हवाई आणि जमिनीवर हल्ले केले जात आहेत. दरम्यान, ख्रिसमसच्या दिवशी इस्रायलने गाझामध्ये मोठा हवाई हल्ला केला आहे. यामध्ये लहान मुलांसह सुमारे 70 जणांचा मृत्यू झाला आहे. गाझा पट्टीतील हा हवाई हल्ला सर्वात प्राणघातक मानला जात आहे. रविवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेला हा हवाई हल्ला सोमवारी सकाळपर्यंत (ख्रिसमस) पर्यंत सुरू होता. स्थानिक रहिवासी आणि पॅलेस्टिनी माध्यमांनी सांगितले की इस्रायलने मध्य गाझामध्ये हवाई आणि जमिनीवर गोळीबार केला आहे.

हे सुद्धा वाचा

गाझामधील मृतांची संख्या 20 हजार पार

मिळालेल्या माहितीनुसार, गाझामधील आरोग्य मंत्रालयाचे म्हणणे आहे की, इस्रायलच्या हवाई हल्ल्यात सुमारे 70 लोक मारले गेले. निर्वासितांच्या छावणीला लक्ष्य करून हे हल्ले करण्यात आले. अनेक घरांना याचा फटका बसला आहे. गाझामधील आरोग्य मंत्रालयाचे म्हणणे आहे की मृतांची संख्या 20 हजार ओलांडली आहे, त्यापैकी दोन तृतीयांश महिला आणि मुले आहेत.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments