
Sanjay Raut on BJP : लोकशाहीच्या मंदिराचे स्मशान करायचे आणि अयोध्येत जाऊन राम मंदिरात पूजा करायची, हे ढोंग आमच्याकडे नाही, असे म्हणत संजय राऊतांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
नवी दिल्ली : तीन राज्यांतील निवडणुका जिंकल्यानंतर त्यांना उन्माद चढला आहे, असे म्हणत ठाकरे गटाचे (Thackeray Group) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप आणि मोदी सरकारवर थेट निशाणा साधला आहे. तसेच, पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊतांनी लोकसभेतील खासदारांच्या निलंबनावरही भाष्य केले. दिल्लीतल्या मंदिराचे स्मशान करून तुम्ही अयोद्धेत जाऊन राम मंदिरात पूजा करणार असाल, तर तो राम तुम्हाला पावणार नाही, असे म्हणत राऊतांनी मोदी सरकारला थेट फटकारले आहे.
भाजप निराश आणि वैफल्यग्रस्त होण्याची वेळ







