Friday, August 28, 2026
Homeसातारासातारा : कुसूरमधील युवकाचा दगडाने ठेचून खून | पुढारी

सातारा : कुसूरमधील युवकाचा दगडाने ठेचून खून | पुढारी

सातारा : कुसूरमधील युवकाचा दगडाने ठेचून खून | पुढारी

[ad_1]








ढेबेवाडी / सणबूर; पुढारी वृत्तसेवा : कराड-ढेबेवाडी मार्गावरील वांग पुलाजवळ एका युवकाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना ढेबेवाडीत घडली. सोमवारी रात्री दहाच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. ऋतुराज दिलीप देशमुख (वय 31) असे खून झालेल्या युवकाचे नाव असून तो कुसूर (ता. कराड) येथील आहे. खूनप्रकरणी मालदन व ढेबेवाडीतील तीन संशयितांविरोधात ढेबेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. याप्रकरणी अक्षय दिलीप देशमुख याने दिलेल्या फिर्यादीवरून वैभव काळे (रा. मालदन, ता. पाटण), उमर मुल्ला व शुभम खेडेकर (रा. ढेबेवाडी) यांच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

ढेबेवाडी येथील उमा महेश बारमध्ये काही युवक मद्यपानासाठी गेले होते. तेथे ऋतुराज देशमुख व संशयित यांच्यात वादावादी झाली. या वादावादीनंतर तिघा संशयितांनी दमदाटी करून ऋतुराजला वांग नदीवरील पुलानजीक नेले. बीअर बारच्या पूर्वेस अंदाजे 100 मीटर अंतरावर कराड – ढेबेवाडी रस्त्यावरील अर्धवट बांधकाम झालेल्या इमारतीपासून वांग नदीकडे जाणार्‍या कच्च्या रस्त्यावर रात्री दहाच्या सुमारास संशयितांनी ऋतुराजला बेदम मारहाण केली. या मारहाणीत ऋतुराज याच्या डोक्याला जबर मार लागून तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक अभिजित चौधरी यांच्यासह पोलिस हवालदार विकास सपकाळ व सहकारी घटनास्थळी पोहचले. त्यानंतर जखमी ऋतुराजला स्थानिकांच्या मदतीने उपचारासाठी रूग्णालयात नेण्यात आले. मात्र तत्पूर्वी वाटेतच त्याचा मृत्यू झाला. संशयितांनी घटनेनंतर पोबारा केला आहे. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत संशयितांचा ठावठिकाणा लागला नव्हता.









[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments