Ram Mandir Ayodhya : ‘या’ कारणामुळे २२ जानेवारीला अयोध्येत येऊ नका, राम मंदिर ट्रस्टचे भाविकांना आवाहन

0
13
Ram Mandir Ayodhya : ‘या’ कारणामुळे २२ जानेवारीला अयोध्येत येऊ नका, राम मंदिर ट्रस्टचे भाविकांना आवाहन


नवी दिल्ली : पुढच्या वर्षी २२ जानेवारी रोजी अयोध्येत बांधलेल्या भव्य राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. राम लल्लाच्या मूर्तींची मंदिराच्या गर्भगृहात प्राणप्रतिष्ठापणा केली जाणार आहे. हा सोहळा पाहण्यासाठी देशभरातील भाविक अयोध्या शहरात येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर श्री राम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सचिव चंपत राय (Champat Rai, Ram Mandir Trust Secretary) यांनी आज  राम मंदिर  उद्घाटन समारंभाबाबत माहिती देताना सांगितले की, सोहळा २२ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता सुरू होईल. मंदिराचे गर्भगृह तयार आहे, मूर्तीही तयार आहे, मात्र मंदिराचे काम पूर्ण होण्यासाठी अजून दोन वर्षांचा काळ लागू शकतो.



Source link