Maratha Reservation : मराठा आरक्षण आंदोलनाची पुढील दिशा ‘या’ तारखेला जाहीर करणार, मनोज जरांगेंची घोषणा

0
14
Maratha Reservation : मराठा आरक्षण आंदोलनाची पुढील दिशा ‘या’ तारखेला जाहीर करणार, मनोज जरांगेंची घोषणा


मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रमाणपत्र देण्यासाठी व आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी सरकारला २४ डिसेंबरचा अल्टिमेटम दिला आहे. याला काही दिवसच शिल्लक असल्यानेमराठा आरक्षण आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी आज जालन्यातील अंतरवाली सराटी गावात बैठक बोलावण्यात आली होती. मात्र आंदोलनाबाबत आज कोणताही निर्णय झाला आहे. या बैठकीनंतर मनोज जरांगे यांनी सांगितले की, बीडमध्ये २३ डिसेंबर रोजी होणाऱ्या सभेत आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या अधिवेशनात मराठा आरक्षणाबाबत भूमिका मांडणार आहेत. त्यामुळे आधी त्यांची भूमिका स्पष्ट झाल्यानंतर पुढील निर्णय घेणार असल्याचे जरांगे यांनी सांगितले.



Source link