Saturday, August 29, 2026
Homeमहाराष्ट्रमोठी बातमी! तुळजाभवानीचे मौल्यवान अलंकार गहाळ… देवीचा मुकूट, मंगळसूत्र गायब

मोठी बातमी! तुळजाभवानीचे मौल्यवान अलंकार गहाळ… देवीचा मुकूट, मंगळसूत्र गायब

मोठी बातमी! तुळजाभवानीचे मौल्यवान अलंकार गहाळ… देवीचा मुकूट, मंगळसूत्र गायब

[ad_1]

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या दागिने गहाळ झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मंदिर संस्थानाने उपविभागीय अधिकारी गणेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या १६ सदस्यीय समितीने दिलेल्या अहवालात ही माहिती उघड झाली. मंदिरातील सोन्याचा मुकूट, मंगळसूत्र, नेत्रजोड आणि माणिक मोती आदि दागिने गहाळ झाल्याची माहिती चौकशी समितीच्या अहवालात समोर आली आहे. या प्रकारामुळे राज्यभरातील भाविकांत खळबळ माजली आहे. 
तुळजाभवानीच्या २७ अलंकारांपैकी ४ अलंकार गायब असल्याचे समोर आले आहे. यामध्ये  ८२६  ग्रॅम वजनाचा सोन्याचा मुकूट, ११ पुतळ्या असलेले मंगळसूत्र, नेत्रजोड  आणि माणिक मोती  असे मौल्यवान दागिने गायब आहेत. मंदिर संस्थानाकडून उपविभागीय अधिकारी गणेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली १६ सदस्यांची समिती नेमली होती. या समितीच्या तपासात ही माहिती उघड झाली आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments