
Delhi Crime News : पुण्यात लग्नाच्या दिवशी गिफ्ट दिले नाही म्हणून एका महिलेने पतीचा ठोसा मारून खून केला होता. ही घटना ताजी असतांना राजधानी दिल्लीतून आता एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सोमवारी, दिल्लीच्या सुलतानपुरी भागात एका पतीला आपल्या पत्नीला घराची स्वच्छता आणि साफ सफाई करण्यास सांगणे चांगलेच महागात पाडले आहे. नवऱ्याच्या सांगण्याच्या पत्नीला राग आल्याने तिने रागाच्या भारत थेट चाकूने नवऱ्याचा उजवा कान कापला. पोलिसांनी पीडित नवऱ्याच्या तक्रारी वरुन पत्नीवर गुन्हा दाखल केला आहे.







