Kandivali: नैराश्यातून तरुणाची गळफास लावून आत्महत्या, कांदिवली येथील घटना

0
19
Kandivali: नैराश्यातून तरुणाची गळफास लावून आत्महत्या, कांदिवली येथील घटना


प्रकाश झा (वय, २१) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. प्रकाश हा गेल्या अनेक महिन्यांपासून बेरोजगार होता. दरम्यान, प्रकाश हा २४ नोव्हेंबरपासून कोणालाच दिसला नाही म्हणून शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने त्याच्या घरी जाऊन त्याची चौकशी करण्याचे ठरवले. शेजाऱ्याने प्रकाश याच्या घराचा दरवाजा ठोठावला. परंतु, आतमधून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने शेजाऱ्याने दरवाजा उघडून पाहिला. त्यावेळी प्रकाश हा पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. यानंतर शेजाऱ्याने त्वरीत पोलिसांना याबाबत माहिती दिली.



Source link