Saturday, October 3, 2026
Homeदेश-विदेशDonation to Ram Temple | आयुष्यभराची कमाई राम मंदिरासाठी दान; निवृत्त आयएएस...

Donation to Ram Temple | आयुष्यभराची कमाई राम मंदिरासाठी दान; निवृत्त आयएएस अधिकाऱ्याचा निर्णय, दान करताना म्हणाले… | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

आयुष्यभराची कमाई राम मंदिरासाठी दान; निवृत्त आयएएस अधिकाऱ्याचा निर्णय, दान करताना म्हणाले…

एका निवृत्त आयएएस अधिकाऱ्याने आपली आयुष्यभराची कमाई राम मंदिरासाठी दान करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारमध्ये गृहसचिव राहिलेले निवृत्त आयएएस अधिकारी एस. लक्ष्मीनारायणन (S. Laxminarayanan) यांनी हा निर्णय घेतला आहे. नारायणन यांनी रामचरितमानसाठी 5 कोटी रूपये दिले आहेत.

नवी दिल्ली : एका निवृत्त आयएएस अधिकाऱ्याने आपली आयुष्यभराची कमाई राम मंदिरासाठी दान करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारमध्ये गृहसचिव राहिलेले निवृत्त आयएएस अधिकारी एस. लक्ष्मीनारायणन (S. Lakshminarayanan) यांनी हा निर्णय घेतला आहे. नारायणन यांनी रामचरितमानसाठी 5 कोटी रूपये दिले आहेत.

पाच कोटी रुपये खर्चून तयार केलेले 151 किलो रामचरितमानस मूर्तीसमोर बसवले जाणार आहे. या महाकाव्याचे प्रत्येक पान तांब्याचे असून 24 कॅरेट सोन्यात बुडवले जाणार आहे. त्यानंतर सोन्याने जडवलेली अक्षरे त्यावर लिहिली जातील. यासाठी तब्बल 140 किलो तांबे आणि पाच ते सात किलो सोने लागणार आहे. सजावटीसाठी इतर धातू देखील वापरले जाणार आहेत. या पुस्तकासाठी नारायणन यांनी आपली सर्व मालमत्ता विकून सर्व खात्यांमधील पैसे दान करण्याचा निर्णय घेतला. नुकतेच पत्नीसह अयोध्येला गेलेल्या नारायणन यांनी रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांच्याकडून यासाठी परवानगी घेतली होती.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments