
सिकंदर शेख याचे जन्मगाव असलेल्या मोहोळमध्ये त्याची चक्क हत्तीवरून मिरवणूक काढण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र सिकंदर याने स्वतः हत्तीवर न बसता पूर्वी वस्ताद राहिलेल्या माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर यांना हत्तीवर बसण्याची विनंती केली आणि मिरवणूक काढली. त्याच्या या कृतीचे लोकांकडून कौतुक करण्यात येत आहे. सिंकदरच्या स्वागताला गावकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. ढोल, ताशे, हलग्या, बँजो अशा मोठ्या लवाजम्यासह सिकंदरची शहरातून जंगी मिरवणूक काढण्यात आली.








