
आदित्यला करिअरच्या सुरुवातीला क्रिकेटपटू व्हायचे होते. मात्र, त्याला अभिनय क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली आणि त्याने त्या संधीचे सोने केले. म्हणून आदित्य अनेकदा मुलाखतींमध्ये स्वत:ला अॅक्सिडेंटल अभिनेता असे संबोधतो. आदित्यने २००९मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लंडन ड्रिम’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पण त्याला खरी ओळख ‘ये जवानी है दीवानी’ या चित्रपटाने मिळवून दिली. त्यानंतर त्याचा ‘आशिकी २’ हा चित्रपट सुपरहिट ठरला. अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी आदित्य व्हिजे म्हणून काम करत होता. बॉलिवूडच्या इतर कलाकारांच्या तुलनेत आदित्य खूप उशीरा सोशल मीडियावर आला. त्याला त्याच वैयक्तिक जीवन हे स्वत: पर्यंत मर्यादित ठेवायला आवडत. आदित्यने २०१९ साली इन्स्टाग्रावर अकाऊंट उघडले.






