
मात्र व्हेल माशाचं हे पिल्लू पुन्हा अडकून पडले होते. हा बेबी व्हेल १३ नोव्हेंबर रोजी सकाळी पहिल्यांदा समुद्र किनाऱ्यावर दिसला. याननंतर त्याला खोल समुद्रात सोडण्यासाठी समुद्रात सोडण्यासाठी स्थानिकांसह प्रशासनाचे मोठे रेस्क्यू ऑपरेशन राबवले होते. ४० तासांनंतर व्हेलला समुद्रात सोडण्यात आले. मात्र, पुन्हा हा व्हेल मासा किनाऱ्यावर आला. हा मासा अशक्त झाला होता. त्याची प्रकृती देखील खालावली होती. अखेर त्याचा आज सकाळी मृत्यू झाला.



