Uddhav Thackeray: तुम्ही बॅनर फाडले, निवडणुकीत तुमची मस्ती फाडतो…; मुंब्य्रात उद्धव ठाकरे कडाडले

0
18
Uddhav Thackeray: तुम्ही बॅनर फाडले, निवडणुकीत तुमची मस्ती फाडतो…; मुंब्य्रात उद्धव ठाकरे कडाडले


मुंब्य्रात उद्धव ठाकरे यांच्यासोबत खासदार संजय राऊत, अनिल देसाई, राजन विचारे आणि ठाकरे गटाचे इतर नेतेही उपस्थित होते. दरम्यान, जनतेला संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आज संपूर्ण मुब्रा रस्त्यावर उतरला आहे. कारण त्यांना गेल्या काही दिवसांपूर्वी सत्तेचा माज आलेला आहे, त्यांनी बुलडोझर लावून शिवसेनेची शाखा पाडली. त्यांना खरा बुलडोझर काय असतो, हे दाखवण्यासाठी मी मुंब्रामध्ये आलो आहे. या नेभळटांना मी एवढच सांगतो की त्यांची जी मस्ती आहे, आज सकाळी मला कळले, त्यांनी आपले पोस्टर्स फाडली, निवडणुका येऊद्या आम्ही तुमची मस्ती फाडतो.



Source link