Pune Truck Accident : भरधाव ट्रकने दुचाकीला उडवलं, दोघांचा मृत्यू, पुण्यातील धक्कादायक घटना

0
16
Pune Truck Accident : भरधाव ट्रकने दुचाकीला उडवलं, दोघांचा मृत्यू, पुण्यातील धक्कादायक घटना


मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोरमध्ये भरधाव ट्रकने एका दुचाकीला धडक दिली आहे. पुण्याहून लोणी काळभोरकडे येत असलेल्या दुचाकीला ट्रकने टक्कर दिल्याने त्यात गणेश हवालदार आणि त्याचा मित्र आदित्य साठे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. अपघातानंतर ट्रकचा चालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून लोणी काळभोर परिसरात सातत्याने अपघात होत असल्याच्या घटना समोर येत आहे. काही दिवसांपूर्वीच लोणीतल्या मुख्य रस्त्यावर एका कारला भीषण अपघात झाला होता.



Source link