Tuesday, August 18, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai Air Pollution : प्रदूषण वाढल्यामुळं मुंबईत मास्कची सक्ती होणार?; बीएमसीनं केला...

Mumbai Air Pollution : प्रदूषण वाढल्यामुळं मुंबईत मास्कची सक्ती होणार?; बीएमसीनं केला खुलासा

Mumbai Air Pollution : प्रदूषण वाढल्यामुळं मुंबईत मास्कची सक्ती होणार?; बीएमसीनं केला खुलासा

[ad_1]

Mumbai Air Pollution News Updates : गेल्या काही दिवसांपासून देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील हवेची गुणवत्ता सातत्याने खालावत असल्याचं दिसून येत आहे. ठाणे, नवी मुंबई, अंधेरी, चकाला आणि विलेपार्ले या परिसरात हवेची गुणवत्ता खराब स्थितीत पोहचली आहे. त्यामुळं आता मुंबईकरांना त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. हवेची गुणवत्ता घातक स्थितीत पोहचल्याने अनेकांनी मास्क वापरण्यास सुरुवात केली आहे. याशिवाय प्रशासनाकडून यासंदर्भात सूचना जारी करण्यात आल्याची माहिती पसरवल्या जात आहे. परंतु आता ही बातमी चुकीची असून अशा मास्क वापरण्यासंदर्भात मुंबईकरांना कोणत्याही सूचना करण्यात आलेल्या नसल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली आहे. त्यामुळं नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments