Thursday, August 20, 2026
Homeदेश-विदेशIsrael Hamas war | हमासच्या दहशतवाद्यांनी अपहरण करून केलेली मुलगी जिवंत! आईने...

Israel Hamas war | हमासच्या दहशतवाद्यांनी अपहरण करून केलेली मुलगी जिवंत! आईने केला दावा, जर्मन सरकरकडे मदतीची याचना | Navarashtra (नवराष्ट्र)

Israel Hamas war | हमासच्या दहशतवाद्यांनी अपहरण करून केलेली मुलगी जिवंत! आईने केला दावा, जर्मन सरकरकडे मदतीची याचना | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

हमासच्या दहशतवाद्यांनी अपहरण करून केलेली मुलगी जिवंत! आईने केला दावा, जर्मन सरकरकडे मदतीची याचना

शनीची आई रिकार्डाने इंटरनेटवर एक व्हिडिओ संदेश जारी केला आहे. गाझा पट्टीमध्ये राहणाऱ्या तिच्या एका कौटुंबिक मित्राने तिची मुलगी जिवंत असल्याचे सांगितले आहे.

दोन-तीन दिवसापुर्वी हमासच्या दहशतवाद्यांनी (Israel Hamas war)  जर्मनीच्या एका टॅटू आर्टिस्टची हत्या केली होती. तिला निर्वस्त्र करत तिचा मृतदेह ट्रकवर ठेवून फिरवत असल्याचा व्हिडिओ समोर आला होता. ते दहशतवादी एका मुलीच्या अंगावर बसून आनंदोत्सव साजरा करत होते. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी आता वेगळीच माहिती समोर येत आहे. आता आपली मुलगी जिवंत असून मृत नसल्याचा दावा तिच्या आईन केला आहेदेश जारी केला आहे.. जर्मन न्यूज आउटलेट डेर स्पीगलच्या वृत्तानुसार, शनीची आई रिकार्डाने इंटरनेटवर एक व्हिडिओ जारी करत ती जिवंत असल्याचं सांगितलं आहे.

हे सुद्धा वाचा

नेमकं प्रकरण काय

हमासने इस्रायल वर हल्ला केल्यानंतर जगभरात संतापाच वातावरण आहे. हमासचे दहशतवादी एका संगीत महोत्सवात घुसले. त्यांनी येथे किमान 260 लोकांना ठार केले. त्यांनी येथून मोठ्या प्रमाणात लोकांचे अपहरणही केले. सोशल मीडिया दहशतवाद्यांच्या क्रूरतेचे व्हिडिओ समोर येत आहे. असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्याने संपूर्ण जग हादरले आहे. या व्हिडिओमध्ये हमासचे दहशतवादी एका मुलीच्या अंगावर बसून आनंदोत्सव साजरा करताना दिसत होते. ते तिच्या अंगावर थुंकत होते. तिचा मृतदेह ट्रकवर ठेवून शहरात फिरवला होता.  हा व्हिडिओ समोर आल्यानंतर तिच्या कुटुंबाने त्याला त्याच्या टॅटू आणि केसांवरून ओळखले. जर्मन टॅटू आर्टिस्ट शनी लौक असं तीचं नाव आहे. याआधी दहशतवाद्यांनी शनीची हत्या करून त्याच्या मृतदेहाची परेड काढल्याचे सांगण्यात आले होते.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments