Wednesday, August 19, 2026
Homeदेश-विदेशIsrael Hamas war | इस्रायलच्या शक्तीपुढे हमासची माघार! गाझामध्ये तीन लाख सैनिक...

Israel Hamas war | इस्रायलच्या शक्तीपुढे हमासची माघार! गाझामध्ये तीन लाख सैनिक पाहिल्यानंतर म्हणाले- युद्धविराम चर्चेला तयार | Navarashtra (नवराष्ट्र)

Israel Hamas war | इस्रायलच्या शक्तीपुढे हमासची माघार! गाझामध्ये तीन लाख सैनिक पाहिल्यानंतर म्हणाले- युद्धविराम चर्चेला तयार | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

इस्रायलच्या शक्तीपुढे हमासची माघार! गाझामध्ये तीन लाख सैनिक पाहिल्यानंतर म्हणाले- युद्धविराम चर्चेला तयार

गाझा पट्टीला लागून असलेल्या दक्षिण इस्रायलमधील गावे, शहरे आणि वस्त्यांमध्ये हमासच्या दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. या युद्धात दोन्ही बाजूंनी आतापर्यंत 1,587 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

हमास इस्रायलमध्ये युद्ध सुरू होऊन  तीन दिवस झाले आहे. या तीन दिवसात आतपर्यंत एकूण 1100 लोकांचा मृत्यू झाला आहे. हमासने हल्ला केल्यानंतर पेटून उठलेल्या इस्रायलने हमासवर हल्ला (Israel Hamas war) करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला गाझा पट्टीला वेढा घातल्याने तिसऱ्या दिवशीही वीज, इंधन आणि खाद्यपदार्थांचा पुरवठा बंद आहे. हमासविरुद्धच्या निर्णायक युद्धात इस्रायलने तीन लाख राखीव सैनिकही उतरवले. या सैनिकांना पाहून आता हमासने नमतं घेतलं असून आता इस्रायलसमोर युद्धबंदीचा प्रस्ताव ठेवला आहे. ज्येष्ठ नेते मुसा अबू मारझूक म्हणाले, लक्ष्य पूर्ण झालं आहे. आता संभाव्य युद्धविरामावर आम्ही इस्रायलशी चर्चा करण्यास तयार आहोत.

हे सुद्धा वाचा

गाझा पट्टीमध्ये  अनेक लोकांचा मृत्यू

गाझा पट्टीला लागून असलेल्या दक्षिण इस्रायलमधील गावे, शहरे आणि वस्त्यांमध्ये हमासच्या दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. या युद्धात दोन्ही बाजूंनी आतापर्यंत 1,587 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. एकट्या इस्रायलमध्ये 73 सुरक्षा कर्मचार्‍यांसह 900 लोक मारले गेले आहेत, तर इस्रायलच्या प्रत्युत्तराच्या कारवाईत गाझा पट्टीत 687 पॅलेस्टिनींना आपला जीव गमवावा लागला आहे.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments