
telangana election 2023 opinion polls : देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच आज घोषणा करण्यात आली आहे. मिझोराम, छत्तीसगड, राजस्थान, मध्यप्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमधील निवडणुकीचा कार्यक्रम जारी करण्यात आला आहे. या सर्व राज्यांच्या निवडणुकीचा निकाल तीन डिसेंबरला लागणार आहे. मध्यप्रदेश आणि तेलंगणा या महाराष्ट्रालगत असणाऱ्या राज्यांमध्ये निवडणूक पार पडणार आहे. तेलंगणातील सत्ताधारी बीआरएसचे प्रमुख मुख्यमंत्री केसीआर यांनी महाराष्ट्रात राजकीय शिरकाव केला. परंतु आता त्यांचा बालेकिल्ला ढासळण्याचा अंदाज सर्व्हेतून व्यक्त करण्यात आला आहे. याशिवाय दक्षिणेत काँग्रेसला आणखी एक राज्य मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.






