Wednesday, August 26, 2026
Homeदेश-विदेशShani Louk News | हमासच्या दहशतवाद्यांनी जर्मन महिलेची निर्दयपणे केली हत्या, अर्धनग्न...

Shani Louk News | हमासच्या दहशतवाद्यांनी जर्मन महिलेची निर्दयपणे केली हत्या, अर्धनग्न मृतदेह ट्रकमधून फिरवला, थुंकले, नारेही लगावले! | Navarashtra (नवराष्ट्र)

Shani Louk News | हमासच्या दहशतवाद्यांनी जर्मन महिलेची निर्दयपणे केली हत्या, अर्धनग्न मृतदेह ट्रकमधून फिरवला, थुंकले, नारेही लगावले! | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

व्हायरल व्हिडिओमध्ये शानी लुक मृतदेह दिसत असून हमासच्या दहशतवाद्यांनी तिचा मृतदेह ट्रकवर ठेवलेला दिसत आहे. त्यावर दहशतवादी बसले आहेत

इस्रायल आणि हमास (Israel Hamas war) यांच्यात सुरू असलेल्या संघर्षात दोन्ही बाजूंनी आतापर्यंत 1000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अनेक देश या हल्ल्याचा निषेध करण्यात येत आहे. या हल्ल्याविरोधात  जगभरात संतापाची लाट उसळली असतान आणखी संताप वाढवणारा एक व्हिडिओ इस्रायलमधून समोर आला आहे. हमासचे आंतरवाद्यांनी एका जर्मन महिला शानी लुक हिची निर्दयपणे हत्या केली. एव्हढ्यावरचं न थाबंता त्यांनी तिच्या अर्धनग्न मृतदेह ट्रकमधून नेत त्याची धिंड काढली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियवर चांगलाच व्हायरल होत आहे.

हे सुद्धा वाचा

नेमकं काय घडलं?

शानी लुक नावाची ही जर्मन महिला पेशाने एक टॅाटू आर्टिस्ट आहे. ती इस्रायलमध्ये एक म्युझिक फेस्टिवल पहायला तिच्या मित्रांसोबत आली होती. या म्युझिक फेस्टिव्हलमध्ये सुमारे 3,000 लोक सहभागी झाले होते. ज्यामध्ये बहुतेक तरुण हे इस्रायली होते. या हल्ल्यात 260 लोकांचा मृत्यू झाला. यावेळी शानी लुकही जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होती मात्र, हमसच्या आंतकवाद्यांनी तिची निर्दपणे हत्या केली.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments