
शेतात गेलेल्या काही शेतकऱ्यांनी त्यांचे मृतदेह पाहिल्यानंतर हा प्रकार समोर आला. दाम्पत्याच्या डोक्यात, मानेवर धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते. या घटनेची सूचना मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पती-पत्नीची हत्या कशामुळे करण्यात आली, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.



