Sunday, August 16, 2026
Homeमहाराष्ट्रHospital Deaths: रुग्णालयांमधील मृत्यूप्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची राज्य सरकारला नोटिस

Hospital Deaths: रुग्णालयांमधील मृत्यूप्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची राज्य सरकारला नोटिस

Hospital Deaths: रुग्णालयांमधील मृत्यूप्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची राज्य सरकारला नोटिस

[ad_1]

राज्याच्या मुख्य सचिवांना मानवाधिकार आयोगाची नोटिस

राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्या मार्फत राज्य सरकारला राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने ही नोटीस पाठवली आहे. येत्या चार आठवड्यांत या प्रकरणावर तपशीलवार अहवाल सादर करण्याचे आदेश या नोटिसमध्ये राज्य सरकारला देण्यात आले आहे. या रुग्णालयांत सध्या असलेल्या आरोग्याच्या पायाभूत सुविधांची सद्दस्थिती, या सरकारी रुग्णालयांमध्ये डॉक्टर, परिचारिका आणि इतर कर्मचार्‍यांची आवश्यक तसेच सध्याची संख्या किती, तसेच रुग्णांसाठी उपलब्ध औषधांची आणि निदान सुविधांची स्थिती काय आहे, याचा अहवाल आयोगाने सरकारकडून मागवला आहे. रुग्णांच्या मृत्यूसाठी जबाबदार अधिकारी, लोकप्रतिनिधींवर राज्य शासनाने काय कारवाई केली तसेच पीडितांच्या कुटुंबांना देण्यात आलेल्या मदत आणि पुनर्वसनाचा तपशील देण्याचे या नोटिशीत सांगण्यात आले आहे. शिवाय अशा दुर्दैवी घटनांची भविष्यात पुनरावृत्ती होणार नाही याची खात्री करण्यासाठी राज्य सरकारने कोणती पावले उचलली आहे, याचाही तपशील आयोगाने मागवला आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments