[ad_1]
‘चंद्रमुखी २’ ही एका शास्त्रीय नृत्यांगनेची कथा आहे, जिला राजाकडून भूतकाळातील दुष्कृत्यांचा बदला घ्यायचा आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये कंगना क्लासिकल डान्सरच्या रुपात सुंदर दिसली आहे. तिचा हा उग्र अवतार प्रेक्षकांना नक्कीच घाबरवणार आहे. तिचा हा चित्रपट लोकप्रिय तमिळ हॉरर कॉमेडी ‘चंद्रमुखी’ चा सिक्वल आहे, ज्यामध्ये रजनीकांत आणि ज्योतिका यांनी महत्त्वाच्या भूमिका केल्या होत्या. ‘चंद्रमुखी’प्रमाणेच कंगनाचा ‘चंद्रमुखी २’ हा चित्रपटही ब्लॉकबस्टर ठरेल, अशी आशा निर्मात्यांना आहे.
[ad_2]
Source link
