Thursday, October 1, 2026
Homeमहाराष्ट्रजायकवाडी धरणात चार दिवसांत 6 टक्के पाण्याची वाढ, पाहा आजची आकडेवारी?

जायकवाडी धरणात चार दिवसांत 6 टक्के पाण्याची वाढ, पाहा आजची आकडेवारी?

[ad_1]

Jayakwadi Dam Water Level : मागील आठवड्याभरापासून सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे जायकवाडी धरणात (Jayakwadi Dam) सतत पाण्याची (Water) वाढ होतांना पाहायला मिळत आहे. नाशिक येथील महत्वाची धरणं भरल्याने या धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे जायकवाडी धरणात देखील पाण्याची आवक वाढली होती. मागील चार दिवसांत जायकवाडी धरणात 6 टक्के पाण्याची वाढ झाली आहे. जायकवाडीत सध्या 39.8 टक्के पाणीसाठा असून, 10 हजार 125 क्युसेकने आवक सुरु आहे. तर, धरणात एकूण 1586.482 दलघमी पाणीसाठा असून, 848.376 दलघमी जिवंत पाणीसाठा आहे. त्यामुळे यंदा धरण भरण्याची शक्यता कमीच असल्याचे बोलले जात आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments