Tuesday, August 25, 2026
Homeसातारासातारा : प्रियकराशी लग्न करण्यासाठी नवऱ्याचा खून करून हातपाय बांधून कालव्यात फेकले

सातारा : प्रियकराशी लग्न करण्यासाठी नवऱ्याचा खून करून हातपाय बांधून कालव्यात फेकले

सातारा : प्रियकराशी लग्न करण्यासाठी नवऱ्याचा खून करून हातपाय बांधून कालव्यात फेकले

[ad_1]

सातारा : सातारा जिल्ह्यातील (Satara Crime) फलटणमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शहरातील शिवाजीनगरमधील बेपत्ता तरुणाचा खून झाल्याचे समोर आलं आहे. अजित बुरुंगले (वय 24) असे या तरुणाचे नाव आहे. त्याच्या पत्नीने प्रियकराच्या साथीने तसेच अन्य एकाच्या मदतीने खून केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी संशयित अजितची पत्नी शिवानी (वय 19), तिचा प्रियकर करण विठ्ठल भोसले (रा. थेऊर रोड, केसनंद, पुणे) या दोघांना शिताफीने तपास करून अटक केली आहे. यांना मदत करणारा तिसरा संशियत राहुल उत्तम इंगोले (वय 22 रा. वाघोली, पुणे) हा अजून फरार आहे. पोलिस त्याच्या शोधात आहेत. 

मृतदेह सापडल्यानंतर बायकोच्या चौकशीत खुनाचा उलघडा 

रविवारी (17 सप्टेंबर) अजित घरातून कोणालाही माहिती न देता बेपत्ता झाल्याची तक्रार शहर पोलिस ठाण्यात दाखल होती. त्यानंतर दोनच दिवसांनी मंगळवारी गणेश चतुर्थी दिवशी सकाळी विडणी (ता. फलटण) नीरा उजव्या कालव्यात हातपाय बांधलेल्या अवस्थेत तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. त्यामुळे तरुणाचा खून पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह हातपाय बांधून टाकून देण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. 

पोलिसांनी दाखल झालेल्या मिसिंग केसमधील तपशीलाच्या आधारावर तपास केला असतो तो मृतदेह अजितचा असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांचा आधार घेत पत्नी शिवानीकडे कसून चौकशी केली. चौकशीत शिवानीचे करणशी प्रेमसंबंध असल्याचे समोर आले. त्यामुळे प्रेमसंबंधात आणि लग्न करण्यात नवरा अडथळा वाटू लागला होता.

करणने अजितला घरातून बोलवून घेतले

करणने त्याचा साथीदार राहुलसह अजितला फलटणला बोलावून घेतले. यानंतर अजितचा गळा आवळून खून करण्यात आला. त्याचा दोरीने गळा आवळून खून केल्यानंतर हातपाय दोरीने बांधून पुरावा नष्ट करण्यासाठी नीरा उजवा कालव्यामध्ये मृतदेह टाकून दिल्याची कबूली करणने दिली.  या प्रकरणी पोलिसांनी संशयित करण भोसले, आणि अजितची पत्नी शिवानीला अटक केली आहे. पोलिस मदत करणाऱ्या राहुलचा आता शोध घेत आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments