
या व्हायरल व्हिडीओंमध्ये आमिर खान आणि रीना दत्ता मुंबईतील एका ज्वेलरी दुकानाबाहेर दिसले होते. यावेळी दोघेही कॅज्युअल लूकमध्ये दिसले. आमिर खानने निळ्या रंगाचा प्रिंटेड शॉर्ट कुर्ता आणि पायजमा परिधान केला होता. तर, रीना दत्ता देखील जांभळा कुर्ता आणि पांढर्या पँटमध्ये दिसल्या. दोघांना एकत्र पाहून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या. आमिर खान आणि रीना दत्ता यांनी तब्बल २१ वर्षांपूर्वी एकमेकांपासून घटस्फोट घेतला होता. आमिर खान रीना दत्तापासून वेगळा झाला असला, तरी दोघांचे एकमेकांशी चांगले नाते आहे.







