
साक्षी चैतन्यला जाळ्यात अडकवून त्याच्याकडून आश्रमाचा आराखडा काढून घेते. चैतन्य जेव्हा पूर्णपणे दारूच्या नशेत धुंद होतो, तेव्हा साक्षी आणि महिपत त्याच्याकडून या केसची माहिती काढून घेण्याचा प्रयत्न करतात. आता यामुळे अर्जुन कोर्टात नेमके काय प्रश्न विचारू शकतो, याचा अंदाज त्यांना येणार आहे. मालिकेच्या येत्या भागांमध्ये हे रंजक कथानक पाहायला मिळणार आहे.







