
[ad_1]
दादा कोंडके हे मराठी प्रेक्षकांचे जसे लाडके होते तसे ते बॉलिवूडमधील अनेक कलाकारांच्याही आवडीचे होते. दादांमधील कल्पकता, सिनेमाचे तंत्र, चित्रपटासाठी कष्ट घेण्याची तयारी हे नेहमीच हिंदी सिनेमातील कलाकारांनाही खुणावत होते. दादा कोंडके यांची अनोखी रोमँटिक कॉमेडी पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे. ३ सप्टेंबरला ‘बोट लावीन तिथं गुदगुल्या’ या सिनेमाची पर्वणी प्रेक्षकांना मिळणार आहे. तर या सीझनची सांगता १० सप्टेंबरला ‘आली अंगावर’ या सुपरहिट चित्रपटाने होणार आहे. त्यामुळे येत्या काळात दादा कोंडके यांचे आणखी दोन चित्रपट पाहायला मिळणार असल्यामुळे चाहते आनंदी झाले आहेत.
[ad_2]
Source link
