
पोलिसांनी सांगितले की, इरफान युनूस नमकवाला आणि इम्रान नमकवाल हे दोघे भाऊ असून ते नागपाडा येथे एकाच घरात राहत होते. मोठा भाऊ इरफान याने यापूर्वी इम्रानला मदत केली होती. ते दोघेही ग्रँट रोड येथील लॅमिंग्टन रोड येथे इलेक्ट्रॉनिक दुकान चालवत होते. मात्र, जेव्हा इम्रानचा व्यवसाय भरभराटीला येऊ लागला तेव्हा मोठा भाऊ त्याची प्रगती पाहून जळत होता. त्यांच्यात आर्थिक वादही होते होते. यामुळे त्याने त्याच्या भावाचा काटा काढण्याचे ठरवले.






