Saturday, August 22, 2026
Homeसाताराशिरवळमधील गोकुळ लॉजवर एलसीबीचा छापा | पुढारी

शिरवळमधील गोकुळ लॉजवर एलसीबीचा छापा | पुढारी

शिरवळमधील गोकुळ लॉजवर एलसीबीचा छापा | पुढारी

[ad_1]








शिरवळ, पुढारी वृत्तसेवा : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील शिरवळ गावच्या हद्दीत शिरवळ पोलिस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण (एलसीबी) च्या पथकाने वेश्या व्यवसाय सुरू असणार्‍या गोकुळ लॉजवर मंगळवारी छापा टाकला. यामध्ये दोन पीडित महिला, चालक महिला व हॉटेल मालक अशा चौघांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.

स्थानिक गुन्हे अन्वेषण (एलसीबी) विभागाला गोकुळ लॉजवर वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली. याची खात्री करण्यासाठी एलसीबीच्या पथकाने लॉजवर एक बनावट ग्राहक पाठवले. या ग्राहकाकरवी लॉजमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाची विस्तृत माहिती मिळवल्यानंतर मंगळवारी दुपारी एलसीबी आणि शिरवळ पोलिसांनी हा छापा टाकला.

पोलिसांनी छापा टाकल्यानंतर लॉजमध्ये एकच कल्लोळ उडाला. पोलिस आले म्हटल्यावर अनेकांनी आपला गाशा गुंडाळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी कुणालाही जागचे हलू दिले नाही. या कारवाईत पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये दोन पीडित महिला, चालक महिला आणि गोकुळ लॉजचा मालक अशा चौघांचा समावेश आहे. लॉजवर छापा टाकल्याची माहिती पसरल्यानंतर शिरवळमध्ये चौका चौकात चर्चा सुरू होत्या.

एलसीबीने छापा टाकून संशयितांना पकडल्याने शिरवळमधील वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश झाला आहे. किती वर्षांपासून लॉजवर वेश्या व्यवसाय सुरू होता? यामध्ये आणखी कोणा-कोणाचा सहभाग आहे? वेश्या व्यवसायासाठी मुली व महिला कोणाकडून येत होत्या? आणखी पीडित महिला आहेत का? असे सवाल या कारवाईमुळे उपस्थित केले जात आहेत.









[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments