Friday, August 14, 2026
Homeसातारासातारा: पाटेघर, आलवडी परिसरात गव्यांचा मुक्त वावर | पुढारी

सातारा: पाटेघर, आलवडी परिसरात गव्यांचा मुक्त वावर | पुढारी

सातारा: पाटेघर, आलवडी परिसरात गव्यांचा मुक्त वावर | पुढारी

[ad_1]








पुढारी वृत्तसेवा : सोमनाथ राऊत : परळी खोऱ्यातील दुर्गम असणाऱ्या व कास पठाराच्या खालील बाजूस असलेल्या पाटेघर, आलवडी परिसरात गवे तसेच हिंस्र प्राण्यांचा वावर वाढला आहे. अगदी घराच्या बाजूला असणाऱ्या शेतामध्येही गव्यांचे भरदिवसा कळप फिरू लागल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आलवडी येथे आज (दि.२०) दुपारी शेतकऱ्यांनी रानात आलेल्या गव्यांचा कळप हुसकावून लावण्यासाठी पाळीव कुत्री त्यांच्या मागावर पाठवली. मात्र, गवे व पाळीव कुत्रे एकमेकांच्या मागे लागू लागली.

गवे व हिंस्र प्राण्यांच्या वावरामुळे शेतीचे अतोनात नुकसान होत आहे. कोअर झोन व बफर झोन परिसरात असणाऱ्या शेतकऱ्यांनी हिंस्त्र प्राण्यांच्या भीतीने शेती करणे बंद केले आहे. डोंगरदऱ्यातील माणसे आपल्या रानात एकटी दुकटी जाण्यास घाबरत आहेत. तरी या प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी पाटेघर, अलवडी, धावली, जांभळमुरे, कासानी या परिसरातून होत आहे.

हेही वाचा 









[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments