Friday, September 25, 2026
Homeसातारा४० आमदार घेऊन वजीर गायब होणार, म्हणून पवारांनी राजीनामा दिला : आ....

४० आमदार घेऊन वजीर गायब होणार, म्हणून पवारांनी राजीनामा दिला : आ. महेश शिंदे | पुढारी

[ad_1]








सातारा; पुढारी वृत्तसेवा : पवार साहेब हुशार आहेत. वजीर निघून चालला आहे हे त्यांना कळले होते. राष्ट्रवादी पक्षच नामशेष होण्याच्या मार्गावर चालला होता. ४० आमदारांसह त्यांचा वजीर गायब होणार होता आणि ते होणारही आहे. पक्ष टिकवण्यासाठी त्यांना राजीनामा द्यावा लागला आहे. अशी खोचक टीका शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी साताऱ्यात केली.

यावेळी आमदार महेश शिंदे म्हणाले, प्रत्येकाला मुख्यमंत्री व्हायचं आहे. राष्ट्रवादी पक्षात धुसफूस आहे. हे अक्खा महाराष्ट्र पाहतोय. एका घरात २ मुख्यमंत्री कसे होणार? हा मोठा प्रश्न निर्माण झालाय.

उद्धव ठाकरेंवर बोलताना शिंदे म्हणाले, ज्या जमिनीवर आपण उभा होतो ती जमीनच आपली नाही हे उद्धव ठाकरे यांना कळायला लागलं आहे. ती जमीनच विकली गेली आहे. जमिनीचा सातबारा दुसऱ्याच्या नावावर आहे. महाविकास आघाडीची वज्रमुठ होतीच कुठं? वज्रमुठ करायला अंगात ताकद लागते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वज्रमुठ गायब केली आहे. वज्रमुठ टिकवण्यासाठी केविलवाणा प्रयत्न सुरू असल्याची बोचरी टीका शिवसेनेचे आमदार महेश शिंदेंनी महाविकास आघाडीवर केली आहे.

अधिक वाचा :









[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments